वाघळवाडी : बारामती
ग्रामविकास संघटना वाघळवाडी संचालित उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. राज्यातील पहिली N.C.C. मान्यता प्राप्त आश्रमशाळा बनण्याचा मान या शाळेला मिळाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व, शिस्त आणि देशभक्तीचा मौल्यवान वारसा मिळणार आहे.
दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी 01 महाराष्ट्र सिग्नल कंपनी N.C.C., सेनापती बापट रोड, पुणे यांच्या वतीने शाळेला अधिकृत मान्यता देण्यात आली. याअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी 25 विद्यार्थ्यांची आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी आणखी 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया कठोर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
या निवड प्रक्रियेसाठी 01 महाराष्ट्र सिग्नल कंपनी N.C.C. चे सुभेदार श्री. बालाजी कदम (सेना मेडल) आणि हवलदार श्री. अजय कुमार सर यांनी शाळेत हजेरी लावली. सकाळपासून सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांची फिजिकल टेस्ट (ग्राउंड टेस्ट) – रनिंग, पुश-अप्स, सिट-अप्स – तसेच लेखी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये एकूण 25 विद्यार्थी (13 मुली व 12 मुले) यांची निवड झाली.
शाळेतील श्री. प्रमोद सदाशिव टेकाळे, जे N.C.C. ‘सी’ सर्टिफिकेट प्राप्त शिक्षक आहेत, यांची केअर टेकर ऑफिसर (C.T.O.) म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे या मान्यतेच्या अंमलबजावणीत शाळेला अनुभवी मार्गदर्शन लाभणार आहे.
या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत तसेच संचालिका आदरणीय सावंत मॅडम यांनी पात्र विद्यार्थी,शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोटे सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर यांचे अभिनंदन केले.
0 Comments